... तर तुम्ही अडाणी ...; आमचं कुलदैवत !
कोर्टामध्ये एका पक्षकाराने प्रसाद दिला नि म्हणाला : साहेब, कुलदेवीला जाऊन आलो परवाच !
वर्षातून एकदा कुलदेवीचं दर्शन घ्यायला पाहिजे.
मी म्हणालो : बरोबर आहे .
त्यानं विचारलं : साहेब तुमचं कुलदैवत कोणतं ?
मी म्हणालो : आमचं कुलदैवत एकदम जागृत आहे.
त्याची २३ हजार देवळं आहेत.
आणि १५ लाख कट्टर भक्त आहेत.
त्यानं विचारलं : तुम्ही कधी हल्ली दर्शन घेऊन आलात ?
मी म्हणालो : आम्हाला दररोज दर्शन घडतं !
तो म्हणाला : साहेब सांगा ना ! तुमचं कुलदैवत कोणतं ?
मी म्हणालो : आमचं कुलदैवत महामानव, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर !!
तो एकदम चरकला.
त्याच्या मणक्यातून शिरशिरी गेलेली जाणवली !!
मी म्हणालो : आता नीट ऐका.
देशात २३ हजार न्यायालय आहेत.
ती बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालतात.
भारतात १५ लाख वकील आहेत.
जे बाबासाहेबांच्या संविधानाचा अभ्यास करतात.
आमचं कुलदैवत १४० कोटी लोकांचं अखंड रक्षण करत.
ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत होणाऱ्या निवडणुका हा आमच्या देवाचा उत्सव !!
बाबा, '
फक्तं दलितांचे कैवारी होते, असं समजत असाल तर तुम्ही अडाणी ... !
..✍️ॲड. संजय रोडे, परळी वैजनाथ.
मोबाईल : ८१४९९९२७४२