सोलापूर : नुकत्याच पार पडलेल्या ४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा २०२३ स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात महागायक विजेते तथा सोलापूर चे ब्रँड अॅ म्बेसडर मोहंम्मद अयाज यांचा धम्माल संध्या हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पोलीस महासंचालक सुनिल फुलारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी सोलापूर आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त डाॅ. राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डाॅ. दीपाली काळे , पोलीस उपायुक्त अमीत बोराडे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस सहायक आयुक्त संतोष गायकवाड, पोलीस सहाय्यक आयुक्त प्रान्जली सोनवणे, पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, उदयसिंह पाटील, जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोगल यांच्यासह पोलीस परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पोलीस परिवाराच्या सेवेशी सांस्कृतिक कार्यक्रम करताना अत्यानंद झाला. मी त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस परिवारचे सदैव आभारी व ऋणी आहे, अशी भावना मोहम्मद अयाज अयाज यांनी व्यक्त केली.
........
छायाचित्रात पोलीस महासंचालक सुनिल फुलारी, पोलीस आयुक्त डाॅ. राजेन्द्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली काळे, पोलीस उपायुक्त बोराडे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे छायाचित्रात दिसत आहेत.