पत्नीस आणण्यासाठी सासुरवाडीत गेलेल्या जावयाची जबर धुलाई; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : माहेरी वास्तव्यास असलेल्या पत्नीस घेऊन जाण्यासाठी आलेल्या जावयाला सासरवाडी जबर मारहाण झालीय. ही घटना सोलापुरातील पेंढारी मस्जिद, मुर्गी नाल्याजवळ शनिवारी रात्री घडली. आसिफ अलिबाग शेख (वय-३२ वर्षे) असं धुलाई झालेल्या जावयाचं नांव आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार ०५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सदर बझार, डाळ गल्लीतील रहिवासी आसिफ अलिबाग शेख, त्याच्या पत्नीस घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी आला होता, त्यावेळी झालेल्या बाचाबाचीत सासरे चाँदसाफ सय्यद यांनी त्यांच्या मुलीस, तुझ्यासोबत पाठविणार नाही, असे सांगून मारहाणीस प्रारंभ केला. त्यावेळी त्या कुटुंबातील अन्य चौघांनी आसिफ शेख याला दमदाटी, शिवीगाळी आणि मारहाण केली.
याप्रकरणी आसिफ शेख यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार तन्वीर सय्यद, मुनीर सय्यद, खुर्शीद सय्यद, चॉदसाब सय्यद आणि जिन्नत शेख (सर्व रा- पेंढारी मस्जिद, मुर्गी नाल्याजवळ, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस हवालदार कंचे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.