(प्रतिकात्मक छायाचित्र)
जिल्ह्याचे कुमार व मुली खो-खो संघ जाहीर
मुलींचे शिबिर निम्बर्गी येथे व मुलांचे शिबिर मंद्रूपला उद्यापासून
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून सोलापूर जिल्ह्याचे कुमार व मुली खो खो संघ असोसिएशनचे सरचिटणीस ए. बी. संगवे यांनी जाहीर केले. हे संघ राजाराम शितोळे धोंडीराम पाटील व संतोष कदम या निवड समिती सदस्यांनी निवडले.
निवडलेल्या संघातील १५ खेळाडूंनी सराव शिबिरात जन्मतारखेचा विहित नमुन्यातील दाखला आणि मूळ जन्मतारखेचा दाखला घेऊन सराव शिबिरास उपस्थित राहावे. सराव शिबिरासाठी खेळाडूंनी, १३ डिसेंबर रोजी सकाळी उपस्थिती नोंदवावी. निवड झालेले खेळाडू उपस्थित न राहिल्यास राखीव खेळाडूंना संधी दिली जाईल. खेळाडूंनी स्पर्धेला जाण्याच्या तयारीनेच यावे. मुलींचे शिबिर निम्बर्गी येथे व मुलांचे शिबिर मंद्रूप येथे होईल. मुलींनी तुळशीराम शेतसंदी ( मो. ८७८८७२०५४५) आणि मुलांनी बबलू शेख ( मो. ७०६६०६७७८६) यांच्याशी संपर्क साधावा.
कुमार संघ : गणेश बोरकर, कृष्णा बनसोडे, अरमान शेख, शंभूराजे चंदनशिवे (अर्धनारी नटेश्वर, वेळापूर) प्रतीक शिंदे, फराज शेख, अविनाश हरभरे (उत्कर्ष, सोलापूर), रोहन रजपूत, मोहन चव्हाण, नीरज कोळी (किरण स्पोर्टस, सोलापूर), उमाजी केंगार (मरवडे), शुभम चव्हाण (दिनबंधू, मंद्रूप), प्रेम जाधव (गोल्डन, मंद्रूप), सुजित मेटकरी (शिवप्रतिष्ठान, मंगळवेढा) लक्ष्मण सलगरे (दक्षिण सोलापूर).
मुली : अर्चना व्हनमाने, सादिया मुल्ला, सृष्टी रुपनर, स्नेहा निम्बर्गी, साक्षी व्हनमाने (किरण स्पोर्टस, सोलापूर), ऋतुजा पासले, ऋतुजा यलमार, वैष्णवी काळे (के.के. स्पोर्ट्स, वाडीकुरोली), साक्षी इंगळे (बाळराजे, अनगर), श्रेया चव्हाण, आर्या चोरमले (उत्कर्ष, सोलापूर), प्राजक्ता बनसोडे, अश्विनी मांडवे, मुस्कान शेख (अर्धनारी नटेश्वर, वेळापूर), वैष्णवी फडतरे (दक्षिण सोलापूर).