Type Here to Get Search Results !

शिवसेना नेते खासदार संजय राऊत रविवारी सोलापूर दौऱ्यावर; महाविकास घटक पक्ष पदाधिकाऱ्यांशीही चर्चा

 


शिवसेना नेते खासदार संजय राऊत रविवारी सोलापूर

दौऱ्यावर; महाविकास घटक पक्ष पदाधिकाऱ्यांशीही चर्चा

सोलापूर : शिवसेना नेते, दैनिक 'सामना ' चे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत रविवारी, १० डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत असून, सकाळी १० वा. सोलापूर श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात आयोजित सत्कार व त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी वार्तालाप करतील, त्यानंतर सकाळी ११  वाजता पद्मशाली चौकातील महाराष्ट्र कामगार सेना कार्यालयात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष विष्णू कारमपुरी यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सकाळी ११:३० वाजता जुना वांगी रोड, नवीन आरटीओ कार्यालय रस्ता, सुभद्रा जाधव मंगल कार्यालयात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. खासदार संजय राऊत या बैठकीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्याच ठिकाणी दुपारी १२:३० वा. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ते शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, असं जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले.

खासदार राऊत, दुपारी ०१.३० वा. हेरिटेज मंगल कार्यालयासमोर गांधीनगर येथे शहर मध्य विधानसभा संघटक अमित भोसले यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दुपारी ०२ ते सायंकाळी ०५ वा. या काळात भोजन व विश्रांतीसाठी राखीव असल्याचेही जिल्हा संपर्कप्रमुख कोकीळ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

सायंकाळी ०५.३० वा. बाळे चौक येथे बाबासाहेब श्रावण भंवर यांच्या हॉटेल लिमोर या नवीन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम आटोपून, सायंकाळी ०७ वा. ते जिल्हाप्रमुख अजय दासरी यांचे पुत्र चिरंजीव करण दासरी यांच्या विवाह प्रित्यर्थ विजापूर रस्त्यावरील नेहरूनगर येथे सुंदर मल्टीपर्पज हॉलमध्ये आयोजित स्वागत समारंभाला खासदार राऊत उपस्थित राहणार आहेत. रात्री आठ वाजता सोलापूर-पुणे मार्गे ते मुंबईकडे प्रयाण  करतील, अशी ही जिल्हा संपर्कप्रमुख कोकीळ यांनी शेवटी सांगितले.