सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील बादोला येथील प्रगतशील शेतकरी गुरण्णा शिवनिंगप्पा बिराजदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते मृत्यूसमयी ८५ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी, ३१ डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता बादोला येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कृषी विभागातील कोल्हापूरचे सहसंचालक बसवराज बिराजदार यांचे ते वडील होत.