सोलापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व हनुमान मंदिर, न्यू लक्ष्मी चाळ, देगांव रोड, सोलापूर येथे योगीराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे धाकटे बंधू योगीराज श्री संत सोपान काका महाराज सासवड यांच्या समाधी सोहळा महोत्सवानिमित्त श्री गुरू गुरुजी बुवा राशीनकर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने व अखिल भाविक वारकरी मंडळ यांच्या सहकार्याने बुधवारी, ०३ ते १० जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजीत केलेला आहे.
या मध्ये पहाटे ०५ ते सकाळी ०७ काकडा आरती, सकाळी ०७ ते १० श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ०२ ते ०४ रामायण कथा, दुपारी ०४ ते ०६ महिला भजनी मंडळ सायं. ०६ ते ०७ हरिपाठ व रात्रौ ०८ ते १० हरि किर्तन होईल.
महिला भजनी मंडळामध्ये न्यु लक्ष्मी चाळ, ज्ञानाई श्री पुराणीक बुवा, कु. प्रणिती चांगभले, कु. संस्कृती घुले, श्री संत गोरोबा काका व सलगरवाडी यांचे भजन होईल.
या नाम सप्ताह मध्ये ह.भ.प. भरत महाराज फडतरे (बेळगांव), ह.भ.प. भागवत महाराज चवरे (पंढरपूर), ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे (सोलापूर), ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास (पंढरपूर), ह.भ.प. विष्णू महाराज टेंबूकर (पंढरपूर), ह.भ.प. एकनाथ महाराज हंडे (पंढरपूर), ह.भ.प. माऊली महाराज बचुटे (सोलापूर), ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण (सोलापूर) व ह.भ.प. गुरुजीबुवा राशीनकर महाराज (पंढरपूर) यांचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल.
या कार्यक्रमामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व भजनी मंडळी, गायक, वादक उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उमाकांत निकम, ज्योतीराम चांगभले, शंकर घुले, ज्ञानेश्वर पांडव, राजाराम मगर, अंकुश गायकवाड, न्यू लक्ष्मी चाळ भजनी मंडळ व लोकसेवा बहुउद्देशीय संस्था यांनी केलं आहे.