Type Here to Get Search Results !

कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताहाला प्रारंभ


कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताहाला प्रारंभ 

सोलापूर : कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कुमठे येथे क्रीडा सप्ताहाला गुरुवारी, ०७ डिसेंबर रोजी क्रीडा सप्ताहाचा प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रकाश काशीद सर व मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.



या क्रीडा स्पर्धेत विविध वर्गाचे कबड्डी खो-खो हॉलीबॉल लहान मुलांसाठी लंगडी अशा विविध सांघिक खेळाद्वारे या क्रीडा सप्ताहाला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व विद्यार्थ्यांचे आरोग्य ही चांगले राहावे त्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. शनिवारी, १६ डिसेंबरपर्यंत या विविध स्पर्धा प्रशालेत सुरू राहणार आहेत.

या स्पर्धेत प्रशालेतील ३४० विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेतलेला आहे. अगदी उत्साही वातावरणात या स्पर्धा सुरू आहेत.