शेर-ए-पंजाब चे मालक राजेश मनचंदा यांचे निधन
सोलापूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील प्रसिध्द शेर-ए-पंजाब हॉटेलचे मालक राजेश गुरूबचन मनचंदा (वय ६५) यांचे गुरूवारी, रात्री आठ वाजता हृदय विकाराने आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी, २२ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दमाणी नगरातील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.