आश्वासनांची पूर्तता न झाल्यास ५० हजार कामगार रस्त्यावर उतरतील : विष्णू कारमपुरी
सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील शहरालगत असलेला श्री महालक्ष्मी मंदिर चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेल्या आमरण उपोषण आंदोलन राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनाने तूर्तास स्थगित केल्याचे कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास ५० हजार कामगार रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गुरुवारी, २१ डिसेंबर रोजी श्री महालक्ष्मी मंदिर चौक येथे सकाळी ११.३० वा. कामगार नेते विष्णू कारमपुरी यांनी आमरण उपोषणास प्रारंभ केला. या उपोषणात उपशहर प्रमुख शिवा ढोकळे, शहर उत्तर संघटक जर्गीस मुल्ला, रेवन बुक्कानुरे शिवा ढोकळे, कामगार सेनेचे सहसेक्रेटरी विठ्ठल कुऱ्हाडकर, युवती सेनेच्या शहराध्यक्ष रेखा आडकी, लक्ष्मी ईप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आंदोलकांनी रस्ता मुक्त झालाच पाहिजे, या मागणीसाठी राज्य सरकारचा निषेध करीत आपली मागणी लाऊन धरण्यासाठी घोषणाबाजी केली.
या प्रसंगी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे अधिकारी पांडे व येमूल यांनी उपोषण स्थळी येऊन लवकरात लवकर म्हणजे तात्काळ अपघात मुक्त चौक करण्याचे लेखी पत्र दिले, तात्पुरते वाहनांचे गती कमी करण्याचे छोटे गतिरोधक बसवीत आहोत, महानगरपालिकेच्या माध्यमातून सिग्नल बसविण्यात येईल, असे पत्र दिले. त्याआधारे कारमपुरी यांनी कामगार सेनेच्या सुरू असलेल्या आंदोलन तात्पुरते मागे घेत असल्याची घोषणा केली.
सदर आंदोलनात गुरुनाथ कोळी, बिपिन साबळे, गोवर्धन चिलवेरी, श्रीनिवास बोगा, प्रशांत जक्का, पंडित पाटील, व्यंकटेश गुजर, बसवराज मडीवाळ, गोविंदराज कनकी, उमेश गोणे, सुदर्शन लोमटे, इम्रान शेख, सलीम शेख, अक्षय चिलवेरी, शुभम कारमपुरी, राधिका इप्पा, निर्मला दासी, स्वरूपा मादास, पद्मा दासी, निर्मला बिरु, अक्षय चिलवेरी, पप्पू शेख, शरणप्पा जगले, रमेश चिलवेरी, अजय कारमपुरी, अप्पा चिलवेरी यांच्यासह विडी कामगार, यंत्रमाग कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.