Type Here to Get Search Results !

'आयुष्मान भारत ' मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर




'आयुष्मान भारत ' मिशनचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे गुरुवारी जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर: केंद्र शासनाच्या 'आयुष्मान भारत' मिशन, महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश स. शेटे गुरुवारी, २१ डिसेंबर रोजी राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सामान्यांतील सामान्यांपर्यंत पोहोचावा, याकरता विकास भारत संकल्प यात्रा २०२४ अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या केंद्रस्थानी असलेल्या बैठकींची हमी भारताने निश्चित केली आहे. त्यास ओमप्रकाश शेटे यांचा सोलापूर दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

गुरुवारी, दुपारी ०३.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुष्मान भारत/महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक होत आहे. त्यानंतर दुपारी ०३.३० वा. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सायं ०४.०० वा. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभुत सुविधांची आढावा बैठक होत असून त्यासही डॉ. शेटे उपस्थित राहून आढावा घेणार असल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक किरण नागरे यांनी कळविले आहे.