जनता दरबारास बारा बलुतेदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शंभरहून अधिकांची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेंतर्गत नोंदणी
सोलापूर : भारतीय जनता पार्टी प्रदेश पदाधिकारी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या दुसऱ्या जनता दरबारात नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला असून शंभरहून अधिक नागरिकांनी जनता दरबारात सहभाग नोंदवून विविध योजनांची माहिती घेतली. यावेळी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या १०० हून लाभार्थ्यांची मोफत नोंदणी करण्यात आली.
जनता दरबारात आलेल्या नागरिकांचे नमो ॲप डाऊनलोड करून घेण्यात आले. केंद्र सरकारने नऊ वर्षात केलेल्या कामगिरीची पुस्तिका नागरिकांना यावेळी देण्यात आले. आरोग्य, शिक्षण, कर्ज, महापालिका, महसूल विभाग, परिवहन व अन्य विविध प्रशासकीय कार्यालयातील समस्या विषयांचे निपटारा या जनता दरबाराच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.
यामध्ये विशेषतः सोलापूर महानगरपालिकेतील अतिक्रमण विभाग, रस्ते ड्रेनेज, पाणी,विविध नागरिकांच्या मूलभूत सुविधा व अन्य महापालिकेतील कामांविषयी तत्काळ या समस्याचे निपटारा होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून कामे मार्गी लावत असल्याचे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये नागरिकांना विविध शासकीय योजनाची माहिती देण्यात येऊन त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजीखाने यांनी सांगितले.
यावेळी सृष्टी मल्टी सर्विसेस चे व्यंकटेश कैंची यांचे विशेष सहकार्य मोफत नोंदणी करण्यास लाभले. दर बुधवारी दहा ते एक या वेळेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या शहर कार्यालयांमध्ये नागरिकांच्या समस्या व विविध शासकीय योजनांच्या माहिती देण्यासाठी प्रदेश कार्यकारणी सदस्य उपस्थित राहून समस्यांचे निपटारा करणार आहेत, नागरिकांनी या जनता दरबाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदेश निमंत्रित सदस्य राजा माने यांनी सांगितले.
या जनता दरबारास भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे, सरचिटणीस विशाल गायकवाड, प्रदेश निमंत्रित सदस्य अमर बिराजदार, राजाभाऊ माने, सागर अतनुरे, यतीराज होनमाने, नागेश पासकंटी, महेश देवकर, अंबादास पामू, ओमकार ओंकार होमकर, विशाल धोत्रे, आदिलसह पदाधिकारी यांची उपस्थिती होती.