ला. कल्पेश मालू यांच्या औदार्यातून बिरोबावस्ती शाळेत संगणक प्रदान
कासेगांव/संजय पवार :
लायन्स क्लब ऑफ सोलापूर क्लबच्या वतीने माजी अध्यक्ष ला. कल्पेश मालू यांच्या औदार्यातून ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रारंभापासूनच संगणकाची ओळख व्हावी, या दृष्टीकोनातून कासेगांव येथील बिरोबा वस्ती, जिल्हा परिषद शाळेस संगणक प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या प्रांतपाल ला. भोजराज नाईक निंबाळकर, अध्यक्ष अमोल गवसने, सचिव ला. मंजुनाथ दर्गोपाटील, , यांच्या हस्ते या संगणकाचे वाटप करण्यात आले.
बिरोबा वस्तीसारख्या अनेक ठिकाणी जिथे गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान प्राप्त करून दिले जावे, या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ सोलापूर संस्थेने आजमितीपर्यंत अनेक वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत, त्याचाच भाग म्हणून बुधवारी या शाळेत संगणक प्रदान करण्यात आला. या शाळेचा शिक्षक या नात्याने मी क्लबच्या सर्व सदस्यांचा मनापासून आभारी आहे, असं प्रतिपादन राजशेखर बुरकुले यांनी याप्रसंगी केले.i
यावेळी उपप्रांतपाल ला. एम. के. पाटील, माजी प्रांतपाल ला. डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी, माजी प्रांतपाल ला. अशोक मेहता, प्रांतीय सहसचिव रणजित निंबाळकर, विभागीय सभापती ला. राजेंद्र शहा, विभागीय उपविभागीय सभापती ला. विकास जाधव, सोमनाथ चौधरी यांच्यासह सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असलेले पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.