Type Here to Get Search Results !

भारतीय कला प्रसार अकॅडमी तर्फे गायिका राधा मंगेशकर यांना कला गौरव तर डॉ. करजगींना जीवन गौरव पुरस्कार

 

भारतीय कला प्रसार अकॅडमी तर्फे गायिका राधा मंगेशकर यांना कला गौरव तर डॉ. करजगींना जीवन गौरव पुरस्कार

सोलापूर : स्वर्गीय मोहंम्मद रफी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'रफी सौ साल, लता बेमिसाल', असा सुमधुर संगीताचा कार्यक्रम शनिवारी, २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ०७ वा. हुतात्मा स्मृति मंदिरात येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भारतीय कला प्रसार अकॅडमी सोलापूरचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे महागायक महंमद अयाज यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी भारतीय कला गौरव पुरस्काराने राधा मंगेशकर यांना तर जीवनगौरव पुरस्काराने डॉ. कुमार करजगी यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान श्री सिध्देश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी भूषवित असून प्रिसिजन उद्योग समूहाचे अध्यक्ष यतीन शहा यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरीत करण्यात येतील. या आधी भारतीय कला प्रसार तर्फे जेष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर, दिपाली सय्यद, हेमलता, उषा नाडकर्णी, देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, सर्व संगीत रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन संयोजकांनी केलं आहे.

या पत्रकार परिषदेला भारतीय कला प्रसार अकॅडमी सोलापूरचे संस्थापक महाराष्ट्राचे महागायक महंमद अयाज, मंजुषा गाडगीळ, भाग्यश्री चव्हाण उपस्थित होते.