Type Here to Get Search Results !

... उभयतांच्या निंदनीय कृतीच्या निषेधार्थ भाजपाचे भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन


... उभयतांच्या निंदनीय कृतीच्या निषेधार्थ भाजपाचे 

भारतरत्न डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ धरणे आंदोलन 


सोलापूर : लोकशाहीचे मंदिर संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले अन् राहुल गांधी त्याचे चित्रण करीत होते, असा भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांचा आरोप आहे. उभयतांच्या निंदनीय कृतीच्या निषेधार्थ, गुरुवारी, २१ डिसेंबर रोजी  धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी सांगितले.

तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांचा (व्यंगत्वावर) अवमान करणारे असभ्य व अशोभनीय वर्तन केले अन् राहुल गांधी त्याचे चित्रण करीत होते, याचा निषेध नोंदविण्यासाठी भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथे गुरुवारी सकाळी १० ते १२ वा. दरम्यान धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.