बनू शकतो : जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक राजशेखर शिंदे
सोलापूर : आनंदी वातावरणात सकारात्मक विचार केल्यास हटके काम करण्याची जिद्द असल्यास सकारात्मक विचार करणाऱ्या माणसाच्या सानिध्यात असल्यास दिव्यांगत्वावर मात करून एक यशस्वी उद्योजक बनू शकतो, असे मत जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक राजशेखर शिंदे व्यक्त केले.
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने दिव्यांग संसदेचे आयोजन शिवछत्रपती रंगभवन येथे करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते.
दिव्यांग संसदेचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्र चे व्यवस्थापक राजशेखर शिंदे व जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्य अॅड. लक्ष्मण मारडकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर इतर मान्यवरांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.
प्रीती पारकट्टी यांनी दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तृष्णा गायकवाड यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता याबाबत मार्गदर्शन केले. शिवलीला स्वामी यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबतच्या विविध कर्ज योजना याबाबत मार्गदर्शन केले. तुषार घड्याळे जगदंबा गारमेंट यांनी अनेक दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच अनेक दिव्यांगाना आवाहनही केले आहे, ज्या बेरोजगारांना रोजगाराची आवश्यकता आहे, अशा दिव्यांगांनी संपर्क साधावा. जेणेकरून त्या दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करता येईल.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर तिकटे, रामचंद्र कुलकर्णी, बसवराज जेऊरे, साहेबगौडा पाटील, भीमाशंकर लोखंडे, प्रशांत पवार, चनवीर स्वामी, नरेंद्र वाघमारे, बाळू बिराजदार यांनी परिश्रम घेतले.