बोरामणीत ६११ महिलांना गॅस जोडणी देण्याचा कार्यक्रम
सोलापूर : महिलांच्या सबलीकरणाकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकार वेगवेगळ्या योजना आखत आहे. उज्ज्वला योजनेतून बोरामणीतील ६११ महिलांना गॅस जोडणी देण्याचे काम झाले आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महिलांमधील दुवा म्हणून आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी व्यक्त केले.
बोरामणीतील एसव्हीसीएस प्रशालेच्या प्रांगणात यशस्विनी अग्रो प्रोड्युसर कंपनी, जय सेवालाल इंडियन गॅस कंपनी अंतर्गत आयोजिलेल्या गॅस वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, महेश साठे, मनीष काळजे, सागर सोलापूरे, वैभव हलसगे, सैफन फुलारी, शिवानंद कट्टीमनी, राजकुमार मोरे, लालासाहेब तांबडे, रामचंद्र माळी, संकेत जाधव, कु. पूनम पटले, अंबिका पाटील, सौरभ राऊत, श्रीकांत गोसावी, श्री. जोजन, बिपीन करजोळे, परमेश्वर सुतार, सुनील बोराळे, रामचंद्र होनराव, राजकुमार झिंगाडे, धनंजय गाडवे, गुरव, मधुकर चिवरे, सिद्धाराम हेले, इरेशा अंबारे, मुनिरुद्दीन पठाण, परमेश्वर कुंभार, सुरेश राठोड, आकाश गिराम उपस्थित होते.
शेतकरी महिला कंपनी, शेतकरी व महिला बचत गटांनी संपूर्ण देशासमोर आदर्श मॉडेल निर्माण केले आहे. अनिता माळगे त्याचं प्रतीक आहेत. जी-२० शिखर परिषदेत प्रधानमंत्री मोदी यांनी, त्यांना राज्यातून प्रतिनिधीत्व दिले होते, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मत आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
येत्या काळात आपल्या कार्यामध्ये अडचणी निर्माण करणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मनीष काळजे यांनी यशस्विनी कंपनीच्या कामाला शुभेच्छा दिल्या. अनिता माळगे यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन बेबीनंदा बिराजदार यांनी तर शाम माळगे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन सुरेखा होडगे, अर्चना जाधव, राजेश्री माळी, अलीमून पटेल, रुबिना नदाफ, पूजा पाटील, रेणुका जाधव, कोमल राठोड, पूजा झुरळे, जयश्री कोरे, शीला बारोळे, अविधा जांभळे, राजेश्री राठोड, शोभा कळके, विद्या बिराजदार, ललिता चव्हाण व शबनम मुजावर यांनी केले.
१२ लाखांचा निधी मंजूर
बोरामणीत महिलाच्या विकासकामासाठी यशस्विनी कंपनीसाठी खासदार डॉ. शिवाचार्य यांनी १२ लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे तर आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी २५ लाखांचा निवेदन देण्यात आले आहे. महिलांना बैठकीसाठी बोरामणीत जागा उपलब्ध नाही, ती तातडीने उपलब्ध करून देण्याबाबतही आमदार कल्याणशेट्टी यांनी आश्वासन दिले.