सोलापूर : तेलंगणामध्ये बिडी कामगारांना दरमहा ०२ हजार रुपये पेन्शन दिली जाते, मात्र राज्यातील सरकार बिडी कामगारांना किमान वेतन देऊ शकत नाही, यावरून महाराष्ट्रातील असंविधानिक व गद्दार सरकार हे किती कंगाल आहे, हे दिसून येते, अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोलापुरातील बिडी कामगारांच्या वतीने खा.राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सत्काराला उत्तर देताना शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत बोलत होते.
शिवसेना खासदार शिवसेना नेते व खासदार संजय राऊत रविवारी, सोलापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याअंतर्गत महाराष्ट्र बिडी कामगार सेना च्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी खा. संजय राऊत यांनी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार हे कामगारविरोधी असून कामगारांच्या अनेक योजना आणि कायदे बदलण्यात आले आहेत.
सोलापूरच्या शेजारच्या तेलंगणा राज्यात दरमहा बिडी कामगारांना ०२ हजार रुपये पेन्शन दिली जाते, त्याव्यतिरिक्त केलेल्या कामाचे मजुरी मिळते, राज्यातील घटनाबाह्य सरकार आणि गद्दार सरकार केवळ त्यांची खुर्ची वाचविण्यासाठी आणि भाजपा सत्ता कायम ठेवण्यासाठी सत्तेचे दुरुपयोग करीत आहे. आमच्या बिडी कामगार महिलांना न्याय देण्यासाठी त्यांची इच्छा देखील होत नाही. जे सरकार साधी पेन्शन देऊ शकत नाही, या सरकारला कंगाल नाही तर आणखी काय म्हणायचं, असाही प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सत्कार व महिला विडी कामगारांना मार्गदर्शन या कार्यक्रमप्रसंगी लोकसभा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, जिल्हाप्रमुख अमर पाटील, उपजिल्हाप्रमुख उपशहर प्रमुख विभाग, प्रमुख शाखाप्रमुख, कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी आदी प्रमुख उपस्थित होते
यावेळी प्रारंभी शिवरायांच्या मूर्तीचं पूजन शिवसेना नेते व खासदार राऊत हस्ते करण्यात आले. त्यानंतर कामगारांच्या समक्ष समस्या ऐकून घेतल्या, शेवटी संजय राऊत यांनी, लढण्याची जिद्द ठेवा, भाजप सरकारला धडा शिकवू, असेही आवाहन केले. महाराष्ट्र कामगार सेना, बिडी कामगार महिलांच्या वतीने सत्कार करताना खासदार संजय राऊत एक पेटती मशाल भेट देऊन त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उपजिल्हाप्रमुख शहर प्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुरुनाथ कोळी, विठ्ठल कुराडकर, नागार्जुन कुसुरकर, विजय नेली, पप्पू शेख, रेखा आडकी, जमनाबाई लंगडेवाले, मीराबाई लक्षवाले, लक्ष्मीबाई पा राधिका आप्पा शरणप्पा जगले प्रशांत जगताप पप्पू शेख, सोपान मुनीनाथ कारमपुरी, श्रीनिवास बोगा, नरेश अण्णा प्रभास सिद्रा, शरणप्पा जगले आदींनी विशेष परिश्रम घेतले.
छायाचित्रात महाराष्ट्र बिडी कामगार सेनेच्या वतीने शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना भेटती मशाल भेट देऊन सत्कार करताना, अनिल कोकिळ, मीराबाई, लक्ष्मी वाले, विष्णु कारमपुरी पुरुषोत्तम बरडे, रेखा आडकी, लक्ष्मीबाई मुनीनाथ कारमपुरी, तुळशीबाई चिलवेरी, गुरुनाथ कोळी आदी दिसत आहेत.