![]() |
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा अध्यक्षपदी चेतन भगत यांची निवड
सोलापूर : राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा २०२४ च्या नियोजन आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी रविवारी, १० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वा.संत तुकाराम नगरातील महामंडळाच्या मुख्य कार्यालयात बैठक बोलावणात आली होती. या बैठकीत राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मध्यवर्ती महामंडळाच्या यंदाच्या जन्मोत्सव अध्यक्षपदी चेतन भगत यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीत, सचिवपदी अमित फुटाणे, सारंग बनसोडे, कार्याध्यक्ष महेश नाटेकर, उपाध्यक्ष अनिकेत मोरे, मधुकर कदम, मिरवणूक प्रमुख रोहन लिंबोळे, खजिनदार अजय सिंग आणि सचिवपदी अमित फुटाणे, सारंग बनसोडे यांची निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक मनोज शिंदे होते.
राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. रक्तदान शिबीराची जबाबदारी सागर शिंदे, प्रविण शेळवणे, देवा पुणेकर, उमेश गुडेमल्ले, ओंकार देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
अन्य पदाधिकाऱ्यात सजावट प्रमुख अनिल इंगळे प्रशांत पुजारी, पुजा प्रमुख किशोर मोरे, सिध्दार्थ काटरे. बाळासाहेब कलागते, विकी सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली असून सल्लागारपदी उमेश खरात, भिमाशंकर टेकाळे, प्रा.संजय जाधव, धनाजी घाडगे, विश्वनाथ लकडे, तायप्पा चव्हाण, राकेश कोळी, सचिन कदम, रुपेश शिंदे, अजय गायकवाड आणि प्रसिद्धीप्रमुखपदी दर्शन मोहिते, विजय जाधव आणि चैतन्य मोरे यांची निवड करण्यात आलीय.