Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या नावाने स्वतंत्र संघटना स्थापन करणे यापुढे चालणार नाही : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

 


शिवसेनेच्या नावाने स्वतंत्र संघटना स्थापन करणे 

यापुढे चालणार नाही : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संलग्न किंवा प्रणित संघटना किंवा संस्था यापुढे कोणीही आपण करू नये, जे काही स्थापन करायचे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित कामगार सेना भारतीय कामगार सेना महा संघाच्या संलग्नतेने व मान्यतेने करावे, असे आदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या सर्व अंगीकृत संघटनांचे झालेल्या बैठकीत उपस्थित संघटनेच्या प्रतिनिधींना दिला आहे, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित सर्व कामगार संघटना, धर्मदाय संस्था, आणि विविध क्षेत्रात काम करण्यासाठी प्रतिनिधींची बैठक, ०३ डिसेंबर रोजी दुपारी मातोश्री बंगला येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते व माजी मंत्री व खासदार व भारतीय कामगार संघ सेना महासंघाचे अध्यक्ष अरविंद सावंत, शिवसेना नेते माजी मंत्री अनिल परब, शिवसेना उपनेते व संलग्न संघटनेचे प्रणेते डॉ. भाऊ कोरगावकर, यांच्या प्रमुख उपस्थिती होती. या प्रारंभी बैठकीचे प्रास्ताविक भाऊ बोरगावकर यांनी केले. त्यानंतर उपस्थित प्रतिनिधींनी आपल्या समस्या व अडचणी मांडल्या. सर्व प्रतिनिधींचे  सूचना व अडचणी ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संलग्न संघटना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मूळ पाया आहे, म्हणून यापुढे सर्व संघटनांनी भारतीय कामगार सेना महासंघाचे संलग्न करून घ्या आणि कायदेशीर माध्यमातून सर्व पूर्तता करून घ्या, असा आदेश दिला.



कायदेशीर बाबीसाठी अनिल परब यांना जबाबदार दिली तर भारतीय कामगार सेना महासंघाच्या संलग्नता कायदेशीर करून घेण्यासाठी अरविंद सावंत यांना संपूर्ण जबाबदारी दिली. त्याचबरोबर पुढील  सर्व कामकाजासाठी डॉ. भाऊ बोरगावकर यांची नेमणूक केल्याचे जाहीर केले. यापुढे संलग्नता शिवाय कोणीही नवीन संघटना स्थापन करू नये, असे सुनावले.

याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार आणि भारतीय कामगार सेना, महासंघाचे अध्यक्ष आमदार शिवसेना नेते अनिल परब यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीत महाराष्ट्रातील शिवसेना प्रणित वाहतूक सेना, आरोग्य सेवा सेना, माथाडी कामगार सेना, एसटी व सिटी बस वाहक व चालक, बिडी व यंत्रमाग आणि असंघटित कामगार सेना, महाराष्ट्र कामगार सेना, शेतकरी व शेतमजूर कामगार सेना, विधी व न्याय सेना, आरोग्य कर्मचारी सेना, गुंठेवारी निर्मूलन सेना, रिक्षा मालक चालक सेना, चित्रपट सेना, आणि इतर संलग्न संघटनेचे प्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित होते.