Type Here to Get Search Results !

सोलापुरात आढळले कोरोनाचे ०६ रुग्ण; २ बरे मनपा आयुक्तांचे नागरिकांना आवाहन


सोलापूर : सद्या महाराष्ट्रासह देशाच्या अन्य काही राज्यातून कोविड -19 रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत असताना दिसून येत आहे.  त्यापार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आज अखेर 6 कोविड बाधीत रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 2 रुग्ण औषधोपचाराने बरे झाले असून, उर्वरित 4 रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. नववर्ष स्वागत व  जानेवारी महिन्यात भरणाऱ्या गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करणेत येते की, 

1) नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे  टाळावे. 

2) सर्दी खोकला असणारे, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त यांनी प्राधान्याने मुखपटटीचा वापर करावा.

3)वांरवांर हाताची स्वच्छता राखावी.

4) फल्यू सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण, श्वसनास त्रास होणाऱ्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जावून आपली कोविड चाचणी करुन घ्यावी. तसेच चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वत:हून अलगीकरणात रहावे. 

5)कोविड पॉझीटीव्ह रुग्णांच्या  संपर्कातील व्यक्तीनी आपली कोविड चाचणी करुन घ्यावी.कोविड 19 या आजाराचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असून कोविड 19 अहवाल सकारात्मक आलेल्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सींग करीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे संबधित प्रयोगशाळांकडून पाठविण्यात येत आहेत. त्यांचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत. 

..............

मनपा आयुक्त यांचे आवाहन

सद्या कोविड 19 बाधित रुग्णांमध्ये आढळून येणारा हा व्हेरियंट तुलनेने सौम्य प्रकारचा असून, त्यामुळे मोठयाप्रमाणावर महामारी अथवा जीवितहानी संभवत नाही तरीही काही विपरीत परिस्थिती उदभवल्यास मनपा रुग्णालये, दवाखाने ही औषधोपचार व मनुष्यबळाने सुसज्ज असून नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असं आवाहन मनपा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली.