सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या गुरुवारी, २८ डिसेंबर रोजी च्या सोलापूर दौऱ्यात नियोजन भावनात जिल्हा नियोजन बैठकीस उपस्थित होते. ही बैठक संपवून पालकमंत्री तिथून निघून गेल्यावर एका तरुणाने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
दादासो बबन कळसाईत (वय-३६, रा. टाकळी (टें), ता. माढा) असं त्याचं नांव आहे. त्या गावच्या सरपंचाने व्यायाम शाळा बांधण्याऐवजी स्वतःचे घर बांधल्याचा त्याचं म्हणणं असून या अपहार प्रकरणात अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा कळसाईत याचा आरोप आहे.
दादासो कळसाईत यांनं सांगितले की, सन २०१९ मध्ये आमदार बबन शिंदे यांच्या आमदार निधीमधून टाकळी या गावात व्यायामशाळा बांधण्याकरिता ७ लाख रुपये हे मंजूर करण्यात आले होते. ती रक्कम ठेकेदार जाधव व शाखा अभियंता निकम, उपअभियंता खरात व कार्यकारी अभियंता माने यांनी मंजूर पैसे उचलून गावामध्ये व्यायामशाळा न बांधता सदर पैशांचा अपहार केल्यामुळे लेखी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडे देऊन देखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने तसेच दोन ते तीन वेळा आंदोलन देखील करुन कार्यवाही न झाल्याने त्यांचेवर कारवाई न झाल्याचे निषेधार्थ आज रोजी जिल्हा नियोजन कार्यालय येथे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असल्याचं पोलीस चौकशी सांगितलंय.
त्यास पुढील कायदेशीर कारवाईकरिता सदर बझार पोलीस ठाणे येथे नेण्यात आलं आहे.