पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न ! 'दादासाहेबा' ला १५ दिवस शहरात येण्यास बंदी

shivrajya patra



सोलापूर : जिल्हा नियोजन कार्यालयाबाहेर प्रशासन तक्रारीची दखल घेत नसल्याचा निषेध नोंदविण्यासाठी दादासो बबन कळसाईत या ३६ वर्षीय तरुणानं स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यास शिताफीनं पकडलं. त्यास न्यायालयासमोर हजर केलं, असता न्यायालयानं, पंधरा दिवस सोलापूर शहरात येण्यास बंदी घातली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, माढा तालुक्यातील टाकळी (टेंभुर्णी) येथे आमदार बबन शिंदे यांच्या आमदार निधीमधून व्यायाम शाळा बांधण्याकरिता मंजूर झालेले ०७ लाख रुपये निधीचा अपहार करून गावात व्यायाम शाळा बांधली नाही, दादासाहेब कळसाईत यांनी तालुका तहसील माढा, जिल्हा परिषद सोलापूर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार देऊन उपोषण ही केले होते. 

त्याच्या तक्रारीची चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ दादासाहेब कळसाईत यानं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोर एका हातात आगीचा टेंभा व दुसऱ्या हातातील प्लॅस्टीकच्या कॅनमधील डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेण्याच्या परिस्थितीत पोलिसांनी त्याच्या हातातील आगीचा टेंबा काढून घेऊन शिताफीने पकडून ताब्यात घेतले.



 त्यानंतर दादासाहेब कळसाईत याच्यावर सीआरपीसी१५१(३) प्रमाणे कारवाई करून, न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास योग्य अटी व नियम घालून पंधरा दिवस सोलापूर शहरात येण्याची बंदी घातली असल्याचे सांगण्यात आलंय.

To Top