युनियन एज्युकेशन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी आफरीन शेख यांची निवड

shivrajya patra



युनियन एज्युकेशन प्राथमिक शाळेच्या 

मुख्याध्यापकपदी आफरीन शेख यांची निवड

सोलापूर : युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित युनियन एज्युकेशन प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापकपदी श्रीमती आफरीन अब्दुल कादर शेख यांची निवड करण्यात आली. त्यांचे नियुक्तीचे पत्र संस्थेचे व्हाईस चेअरमन सूरय्या नईम शेख यांच्या हस्ते आफरीन अब्दुल कादर शेख यांना देण्यात आले. 

यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी युनियन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जैद नईम शेख, व्हाईस चेअरमन सुरय्या नईम शेख, खजिनदार नसीमा पठाण शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

To Top