सोलापूर : जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे सोमवारी, ०४ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
या लोकशाही दिनात मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन व अर्ज, माहिती अधिकार अधि.-२००५ अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांच्या लोकशाही दिनातील अर्जावरही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.