सोलापूर : प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गेल्या ३२ तासापासून सुरू असणाऱ्या आंदोलनास अखेर यश मिळाले असून लवकरच कारवाई करण्याचे लेखी आश्वासन महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी दिली आहे... त्यामुळे ३२ तासापासून भोगांव पाण्याच्या टाकीवरील प्रहार चे 'शोले' स्टाईल आंदोलन अखेर समाप्त झाले आहे.
येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांनी दिले आहे, तसेच येत्या दोन दिवसात कारवाई न केल्यास पालकमंत्र्यांचा ताफाही अडविण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला.
या आंदोलनात शहर प्रमुख अजित कुलकर्णी, कार्याध्यक्ष खालीद मणियार, जिल्हा संपर्कप्रमुख जमीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंगाडे, शहर उप प्रमुख मुदसार हुंडेकरी, माजीद पटेल, संजय शिंगाडे, महेश बनसोडे, अश्फाक मुल्ला, सचिन माने, जाविद मणियार, जमीर फुलारी, प्रमोद इंगळे, रशीद शेख, अमजद हुंडेकरी, सोफियान बागवान, मुजाहिद सय्यद, रियाझ सुगुर , सिधप्पा शिंदे आदी उपस्थित होते.