सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवारी, ०६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्था, धाकटा राजवाडा, कुंभार वेस, सोलापूर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस धम्म चक्र प्रवर्तन दिन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थापक सुरज गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुधवारी, सकाळी ०९ वा. ते सायकाळी ०५ वा. दरम्यान हे रक्तदान शिबिर धाकटा राजवाडा, मंगळवार बाजार, सोलापूर येथे आयोजित करण्यात असून इच्छुक रक्तदात्यांनी स्वयं स्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.