Type Here to Get Search Results !

कुलगुरू चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोलापूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचा संघ रवाना



कर्णधारपदी सुनील थोरात यांची निवड; मंगळवारपासून स्पर्धेला प्रारंभ

सोलापूर : अखिल भारतीय कुलगुरू चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संघ नागपूरला रवाना झाला आहे. सोलापूर विद्यापीठ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी सहायक कक्ष अधिकारी सुनील थोरात यांची निवड झाली आहे.

ही स्पर्धा, २६ डिसेंबर ते ०६ जानेवारी २०२४ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर व प्र-कुलगुरू  प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील टीम स्पर्धेसाठी रविवारी नागपूरला रवाना झाला आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या क्रिकेट संघात सुनील थोरात हे कर्णधार व खेळाडू म्हणून उपकुलसचिव डॉ. उमराव मेटकरी, मुक्तार शेख, हनुमंत लोखंडे, श्रीशैल देशमुख, अनिल संभारंम, महादेव वलेकर ज्ञानेश्वर भोई, राजकुमार सले, पंकेश व्हनमाने, अमोल गायकवाड, मिलिंद शिंदे, ज्ञानेश्वर निंबाळकर आणि अतुल दाईंगडे यांची निवड झाली आहे. प्रशिक्षक व कोच म्हणून प्रशांत पुजारी यांची निवड झाली आहे. 

फोटो ओळी

सोलापूर : अखिल भारतीय कुलगुरू चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेसाठी रवाना झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघासमवेत कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, क्रीडा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, एनएसएसचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे आणि परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे छायाचित्रात दिसत आहेत.