समाजाचं ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे गरजेचे : राजेश शाह
सोलापूर : समुहाने कार्य केल्यास समाजात अनेक मोठी कार्य होऊ शकतात, समाजाचं ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने पुढे येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उद्योगपती तथा स्व. महेंद्रभाई स्मृती गौरव पुरस्कार २०२३ चे मानकरी राजेश शाह यांनी केले.
येथील श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळाद्वारे प्रतिवर्षी देण्यात येणार स्व. महेंद्रभाई स्मृती गौरव पुरस्कार २०२३ पुण्याचे राजेश शाह यांना अध्यक्ष मुकेश मेहता यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रविवारी. २४ डिसेंबर रोजी गुजरात भवनच्या सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या गौरव सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना राजेश शाह बोलत होते.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रारंभी उपाध्यक्ष मणिकांत दंड यांनी स्वागत केले. सचिव जयेश पटेल यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष मुकेश मेहता यांनी पुरस्कारविषयी माहिती दिली. रुपये एकवीस हजार,स्मृतिचिन्ह व शाल असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुणे येथे साकार होत असलेल्या सुमारे १०० कोटीच्या 'गुजरात भवन' बद्दल पुरस्काराचे मानकरी राजेश शाह यांनी देऊन गुजराती समाज एकत्र येणे आवश्यक आहे. त्यातून अनेक मोठी कार्य साकार होऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
पाहुण्यांचा परिचय कौशिक शाह तर सूत्रसंचालन सहसचिव संदीप जव्हेरी यांनी केले. याप्रसंगी राजेश शाह यांच्या हस्ते गुजराती दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. खजिनदार चिमण पटेल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या प्रसंगी विश्वस्थ विजय पटेल, बिपीन पटेल, केशवजी रामभिया सह संचालक सर्वश्री संजय शाह, भरत शाह, जगदीश पटेल, संजय पटेल, गोविंद पटेल,निलेश पटेल, हितेंद्र वोरा, महिला मंडळाचे अध्यक्षा पारुल पटेल, युवा फोरमचे अध्यक्ष धर्मेश राडिया, केतन शाह, तरंग शाह, सौ. ज्योती शाह, सौ. प्रीती शाह , सौ. हिना गाला, सौ. स्वाती देसाई, इंदिरा पटेल, उमेश ऐनापुरे, दिलीप माने, सुभाष सुराणा, जगदीश रंभिया आदी उपस्थित होते.