Type Here to Get Search Results !

४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मंगळवारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

 


४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे मंगळवारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर : ४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ चे उद्घाटन पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण येथे मंगळवारी,  ०५ डिसेंबर रोजी सकाळी ०८.०० वा. पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पोलास उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिलीय.

४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ ही ०५ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय सोलापूर शहर व ग्रामीण येथे पार पाडणार आहे. या क्रिडा स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर येथील संघ सहभागी होणार असून १२०० पोलीस खेळाडू सहभाग घेणार आहेत.

४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रिडा स्पर्धा २०२३ चे उद्घाटन पोलीस मुख्यालय सोलापूर ग्रामीण या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. सोलापूर वासियांनी ४९ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा २०२३ चे उद्दघाटन कार्यक्रमकरीता पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथे सकाळी ०७:३० वा उपस्थित रहावे, असे आवाहनही या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आलं आहे.

... क्रीडा स्पर्धेत या खेळांचा समावेश
क्रीडा स्पर्धेत हॉकी, फुटबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, अॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, खो-खो, स्विमींग, ज्युदो, बॉक्सींग, कुस्ती व कब्बडी इत्यादी खेळाचे समावेश आहे.