विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. लक्ष्मीकांत दामा
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक तथा विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांची नियुक्ती झाली.
सोमवारी, ०४ डिसेंबर रोजी सायंकाळी ०४ वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मोहितकर, विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
फोटो ओळी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांना नियुक्ती पत्र देताना कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सचिन गायकवाड, डॉ. विरभद्र दंडे व अन्य छायाचित्रात दिसत आहेत.