Type Here to Get Search Results !

चाँदबीबी सुलतान सोशल ट्रस्टचा यु.एफ. जानराव यांना सामाजिक पुरस्कार

चाँदबीबी सुलतान सोशल ट्रस्टचा यु.एफ. जानराव यांना सामाजिक पुरस्कार जाहीर

सोलापूर : चाँदबीबी सुलतान सोशल ट्रस्ट, सोलापूर या सामाजिक संस्थेच्यावतीने सिने अभिनेते, अभिनय सम्राट दिलीपकुमार जन्म शताब्दी वर्ष साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने वैद्यकीय, विधी, सामाजिक, पत्रकारिता आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या मान्यवर व्यक्तींना सोशल अवार्ड २०२३ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी सोलापुरात होत आहे.

११ डिसेंबर २०२३ रोजी नटसम्राट दिलीपकुमार यांची जन्मशताब्दी आहे. यानिमित्ताने राजमाता चाँदबीबी सुलतान सोशल ट्रस्ट, सोलापूर या सामाजिक संस्थेच्यावतीने रविवारी, १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ०५.३० वा. या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 

यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, महेंद्र कपूर यांच्या गीतांची सुरीली शाम मुंबई येथील आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभाग घेणारे संगीतकार व गायक यांनी गीत सादर करणार आहे. कार्यक्रमाच्या मध्यंतरी सायं. ७.०० वा. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतोय, त्यात  सामाजिक पारितोषिकाचे मानकरी म्हणून यु.एफ जानराव यांची निवड करण्यात आलीय.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे अध्यक्षस्थान भूषवित असून  बॉलिवूडचे निर्माता-निर्देशक व लेखक डॉ. पृथ्वीराज सुरेश ओबेरॉय प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी म.आरिफ शेख (माजी महापौर), रूस्तुम कंपली, मंजुषा गाडगीळ, शकील मौलवी, प्रा. रूपश्री जॉन येवलेकर, जुबेर कुरेशी, अनिल मस्के, म. हुंडेकरी सर आणि रंगनाथ जोशी परिश्रम घेत आहेत.

... आम्ही ट्रस्टचे आभारी आहोत : जानराव यु. एफ.

चांदबीबी सुलतान सोशल ट्रस्ट सोलापूर या ट्रस्टने माझ्या कुष्ठरुग्ण सेवेची आणि सामाजिक कार्याची दखल घेतली असून सिनेभिनेते दिलीपकुमार यांच्या जन्मशताब्दी निमित्त सोलापूर येथे होतं असलेल्या"सुरीली शाम "या कार्यक्रमात मला "सोशल अवॉर्ड " हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे निवडपत्र दिले. माझ्या आयुष्यातील १२६ वा अत्यंत महत्वाचा पुरस्कार असल्यामुळे मी आणि माझे कुटुंब खूप आनंदी असून आम्ही ट्रस्टचे आभारी आहोत, असं जानराव यु. एफ. (माढा) यांनी म्हटलंय.