तामलवाडी : ज्ञानदानाच्या कार्यासाठी बालाजी अमाईन्सकडून पूर्णपणे आमचे सहकार्य असतेच, सरस्वती विद्यालयातून ज्ञानी व सुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी भविष्यकाळात आम्ही संपूर्ण सहकार्य करू, अशी ग्वाही बालाजी अमाईन्स लिमिटेड, तामलवाडीचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व राजेश्वर रेड्डी यांनी दिली.
येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बालाजी अमाईन्स लिमिटेड, यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या ०२ वर्ग खोल्यांचा उद्घाटन समारंभ, बुधवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्र्यंबकेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बसवनाप्पा मसुते हे होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. इमारतीच्या उद्घाघाटन समारंभानंतर व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी, राजेश्वर रेड्डी, यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना बालाजी अमसे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी बोलत होते.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य सुहास वडणे, पर्यवेक्षक औदुंबर माडजे ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत साळुंखे, चांगदेव सावळे, महादेव मसुते, महादेव माळी, प्रभाकर जाधव, लक्ष्मण पाटील, शिवकुमार सिताफळे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक योगेश राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव मसूते यांनी तर चंद्रकांत साळुंखे यांनी शेवटी सर्व उपस्थित आमच्या आभार मानले.