Type Here to Get Search Results !

सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने १७ डिसेंबर रोजी विज्ञान प्राविण्य परीक्षेचे आयोजन


सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने 

१७ डिसेंबर रोजी विज्ञान प्राविण्य परीक्षेचे आयोजन

कासेगांव/संजय पवार : सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने रविवारी, १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १२ वा. दरम्यान विज्ञान प्राविण्य परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरहू विज्ञान प्राविण्य परीक्षा ही इयत्ता सहावी व इयत्ता नववी वर्गासाठी आहे. 

विविध स्पर्धात्मक परीक्षेचा पाया म्हणून या परीक्षेकडे पाहिले जाते. परीक्षा केंद्र हे सहभागी संबंधित शाळा असतील. संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यातून ११ हजार विद्यार्थ्यांची विक्रमी नोंद झाली असल्याची माहिती जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय जवंजाळ यांनी दिली.


या परीक्षेसाठी सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे जिल्हाध्यक्ष संजय जवंजाळ, जिल्हा सचिव जब्बार शिकलगर, व परीक्षा प्रमुख संतोषकुमार दोड्याळे, शितलकुमार पाटील यांनी या स्पर्धेचे नियोजन केले आहे.

ही परीक्षा घेण्यासाठी मार्गदर्शन राज्य विज्ञान मंडळाचे मार्गदर्शक व मंडळाचे आधारस्तंभ राज्य संचालक लक्ष्मीप्रसाद मोहिते, उपाध्यक्ष शिवाजी चापले, नीलकंठ लिंगे, श्रीमती प्रियंका आराध्ये, सुभाष नागरसे व इतर सर्व पदाधिकारी घेत आहेत.