महापालिका पत्रकार संघाच्या वतीने विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा सत्कार
सोलापूर : महापालिका पत्रकार संघाच्या वतीने सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त तथा विद्यमान विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार हे गुरुवारी, २१ डिसेंबर रोजी सोलापुरात आले असता, त्यांचा अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विभागीय उपायुक्त गुडेवार यांनी सोलापूर महापालिकेत आयुक्त असतानाच्या कार्यकाळातील अतिक्रमण कारवाईसह विविध योजना संदर्भात आणि विविध आठवणींना उजाळा दिला. दरम्यान, सोलापुरात बदल झाल्याचे दिसत असल्याचे आवर्जून त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी सल्लागार प्रशांत जोशी, शिवाजी सुरवसे, वेणूगोपाल गाडी, रामेश्वर विभुते, जाकीर हुसेन पिरजादे, विकास कस्तुरे, प्रभुलिंग वारशेट्टी, मकरंद ढोबळे आदींसह पत्रकार उपस्थित होते.