![]() |
राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य
धन्यकुमार जिनाप्पा गुंडे यांचा जिल्हा दौरा
सोलापूर : राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य धन्यकुमार जिनाप्पा गुंडे हे शनिवारी, २३ डिसेंबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी १० वाजता पोलीस उपआयुक्त, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी तसेच अल्पसंख्यांक समुदयाचे प्रतिनिधींसोबत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत बैठक. सकाळी ११.३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरु, विभाग प्रमुख व अल्पसंख्याक विद्यार्थी यांच्यासमवेत बैठक. ते दुपारी २.०० वाजता जिल्हा सोलापूर येथून सांगलीकडे प्रयाण करतील.