अल्पसंख्याक समाजातील
नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहावे : निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे
सोलापूर : शनिवारी, २३ डिसेंबर रोजी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १०.०० वाजता आयोजित राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे यांच्या बैठकीस सोलापूर जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
या बैठकीत अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी केंद्र सरकार पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी, लाभार्थी व अडचणीबाबत आयोगाचे सदस्य धन्यकुमार गुंडे हे आढावा घेणार आहेत. तरी या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या काही अडचणी असतील तरी त्यांनी या बैठकीस उपस्थित राहून अडचणीची माहिती द्यावी, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.