Type Here to Get Search Results !

... न सुटलेल्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार : आमदार कल्याणशेट्टी



... न सुटलेल्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी

आगामी काळात प्रयत्न करणार : आमदार कल्याणशेट्टी

कासेगाव/संजय पवार :

पाणी एकरुख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणात पाणी टाकावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. स्वप्नवत पाणी आज वास्तवात पाहून शेतकरी वर्गाला आनंद झाला आहे, याबद्दल मी राज्य शासन आणि शासनाच्या विविध अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो, अशाच न सुटलेल्या समस्या कायमच्या सोडविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटले.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी गावास उजनीचे पाणी आणून दिल्याबद्दल आणि दिलेल्या शब्दाचं पालन केल्याबद्दल दर्गनहळ्ळी ग्रामस्थांकडून आमदार कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार कल्याणशेट्टी बोलत होते.

१९९४ सालापासून या भागातील शेतकरी पाण्यासाठी वणवण भटकत होते. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी फक्त पाणी प्रश्नावरच  राजकारण केले, परंतु समस्या कायम राहिली होती, अशी कोणाचंही नांव न घेता, कोपरखळी मारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहयोगाने, हा प्रश्न सोडविण्यात यश आल्याचेही आमदार कल्याणशेट्टी यांनी आवर्जून सांगितले.

यावेळेस भाजपा सरचिटणीस सुनिल कळके, भाजपा उपाध्यक्ष महादेव पाटील, ग्रा.प.सदस्य पंकज पाटील, तसेच दर्गनहळ्ळी गावचे माजी सरपंच खब्बाण्णा कोळी, ग्रा.प.सदस्य विलास बिराजदार, ग्रा. प. सदस्य सोमनाथ सरसंबे, माजी सरपंच चन्नविर होनमुर्गीकर, पोलीस पाटील परमेश्वर पाटील, अप्पासाहेब पाटील, मिडिया सेल अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ सागर खांडेकर, केदार उडाणे वरदशंकर कोळी, नागनाथ केगांवकर, महेश डबाणे, संतोष जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.