Type Here to Get Search Results !

सोलापूर महानगरपालिकेत पेन्शनर्स डे साजरा

 

सोलापूर महानगरपालिकेत पेन्शनर्स डे साजरा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील सेवानिवृत धारकांचा १७ डिसेंबर रोजी पेन्शनर्स डे मनपाच्या वतीने साजरा केला जातो. त्यास अनुसरून रविवारी, १७ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वा. महानगरपालिकेतील कौन्सिल हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते मनपाच्या सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. 


याप्रसंगी कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, सोलापूर जिल्हा पेन्शनर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सदाशिव उंब्रजकर, पेन्शनर संघटनेचे कार्याध्यक्ष ए. ए.पठाण,  सचिव रुउफ बागवान, एस. एस रंगदाळ, उपअभियंता व्ही.एस कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी श्रीगणेश बिराजदार, पंडित जानकर, सचिन कांबळे यांच्यासह संघटनेतील सर्व पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.