... पाऊल ठेवलं तर खल्लास करू म्हणत गळा घोटण्याचा प्रयत्न; ०४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : तु इथं आली तर तुझा जीव मारून टाकू, अशी धमकी देत एका विवाहितेचा गळा दाबण्याचा अमानुष घडलीय. हा प्रकार परळी वैजनाथ येथे घडला. त्यामुळे माहेरी आलेल्या ईश्वरी शुभम डोमकलवार (वय-२७ वर्षे, रा. ५७, शिवाजी नगर, बाळे, सोलापूर) हिनं फिर्याद दाखल केल्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील सौ.ईश्वरी शुभम डोमकलवार हिस, तिच्या सासरची मंडळी, संगणमत करून सासरी तिचा छळ करीत होते. त्या छळस कंटाळून माहेरी आलेल्या ईश्वरीने, येथील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात १२ सप्टेंबर २०२३ रोजी सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दाखल केली.
अर्ज चौकशीकामी ईश्वरीच्या सासरचे लोक हजर राहिले नाहीत. त्यानंतर सदर अर्ज हा महिला सुरक्षा विभाग सोलापूर शहर येथे वर्ग केला असता, तेथेही सासरचे लोक समुपदेशन करता हजर राहिले नाहीत.
शेवटचा पर्याय म्हणून, तिचे आई-वडील व मामा सुधीर असे ईश्वरीला सासरी सोडवण्यासाठी, १९ नोव्हेंबर २०२३ रोजी गेले. त्यावेळी तिचा पती, सासू आणि २ नणंदांनी मजकूर यांनी मिळून सौ. ईश्वरीला, 'आत्ताच्या आता निघून जा, तु इथं आली तर तुझा जीव मारून टाकू' अशी धमकी देत तिचा गळा दाबत असताना आई-वडील व मामाने सोडविले. त्यानंतर तिने त्या मारहाणीबाबत परळी शहर पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिला.
त्यांनी वारंवार तक्रारी देऊनही सासरकडील लोकांच्या वर्तनात बदल झाला नाही, तो जाच-हाट अन् त्रासाला कंटाळून तिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्यानुसार शुभम डोमकलवार (पती), जयश्री डोमकलवार (सासू), स्नेहा ऊर्फ सोनी रेवंतवार (नणंद), आणि नेहा ऊर्फ मोनी कोटुलवार (नणंद, सर्व रा. गणेश कुलर फॅक्टरीमागे चांदापूर रोड, परळी वैजनाथ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.