महामार्गावर भरधाव मालट्रकच्या धडकेने ०५ म्हशींचा मृत्यू; अपघातास कारणीभूत मालट्रकही पलटी
सोलापूर : सोलापूर-धुळे महामार्गावर कासेगांव शिवारात भरधाव मालवाहू ट्रकची जोरदार धडक लागून झालेल्या अपघातात ०५ म्हशींचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सद्गुरु पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी सव्वा तीन वा. च्या सुमारास घडलीय. अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक पलटी झाला. अपघात स्थळी पलटी झालेला मालट्रक आणि रस्त्यावरच पडलेले मुक्या प्राण्यांचे मृतदेह हे विदारक चित्र मन हेलावून टाकणारे होते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तुळजापूरकडून सोलापूरकडे येत असलेल्या भरधाव ट्रकची म्हशींच्या दलाला धडक लागली. त्यात ट्रकची धडक लागून जखमी झालेल्या ०५ म्हशींनी तडफडून जागीच प्राण सोडला. अपघातानंतर अपघातास कारणीभूत ठरलेला मालट्रक पलटी झाला.