Type Here to Get Search Results !

परिक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू




परिक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू

सोलापूर : पनवेल महानगरपालिका आस्थपनेवरील  विविध पदे नामनिर्देशनाने व सरळसेवेने भरावयाच्या पदभरती परिक्षा स्थळ सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी ता. पंढरपूर जिल्हा सोलापूर. या ठिकाणी  असल्याने दि. 08 डिसेंबर 2023 ते दि.11 डिसेंबर 2023 या कालावधीत वेळ सकाळी 8.00 वा ते संध्याकाळी 7.00 वा. रोजी नियोजित असलेल्या परिक्षा कालावधीत सर्व परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात शांतता, कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी. परिक्षा शांततेच्या व तणावमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी  दादासाहेब कांबळे  यांनी निर्गमित केले आहेत.

यानुसार पुढील प्रतिबंधात्मक आदेश लागू होत आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, फॅक्स, एस.टी.डी. बुध, ध्वनीक्षेपक, संगणक केंद्र, इंटरनेट कॅफे इत्यादी दळणवळणाची माध्यमे बंद राहतील.  परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, पेजर सारखा दुरसंचार साधने व इतर इलेक्ट्रानिक गॅझेटस, स्मार्ट वॉच, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेवून परीक्षार्थीना प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतेही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनास प्रवेशास मनाई राहील.

तसेच  परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल केवळ संबंधित परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले मुख्याध्यापक, कर्मचारी, शासकिय कामावरील अधिकारी व कर्मचारी संबंधित शाळेतील परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील इतरांना प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्राचे 100 मीटरचे आवारात 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 07.00 वा. ते संध्याकाळी 7.00 वा. या कालावधीत ध्वनीक्षेपके बंद ठेवावीत.

या आदेशाची अवमानता केल्यास भारतीय दंड विधानाचे कलम 188 नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.सदर अधिसूचना परिक्षेच्या कालावधीपुरती अमलात राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.