Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांचा बक्षी हिप्परगे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

 



राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष संतोष पवार 

यांचा बक्षी हिप्परगे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

कासेगांव/ संजय पवार 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड झाल्याबद्दल द सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बक्षी हिप्परगे ग्रामस्थांच्या वतीने शत्रुघ्न माने यांनी गावातील पुष्पहार, शाल, फेटा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

 १४ गावाच्या पाण्याची समस्या, दुष्काळी भागात पाणी, जनावरांना चारा व इतर समस्यांची माहिती शत्रुघ्न माने यांनी यावेळी नुतन जिल्हाध्यक्ष पवार यांना देत, या भागातील अनेक सामाजिक समस्या सोडविण्यासाठी विनंतीही यावेळी केली. 

शत्रुघ्न माने व मित्रपरिवार च्या वतीने गौतम चौधरी, नितीन शिंदे , सागर कुलकर्णी, अण्णा गायकवाड, प्रकाश भाऊ जाधव, मारुती सावत, अमोल कळंब, अण्णा जाधव व सर्व मित्र परिवार उपस्थित होते. सत्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन शत्रुघ्न माने यांनी केले तर मारुती सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.