एचडीएफसी बँक आणि कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट
यांच्या शालेय कामाचे उद्घाटन व लोकार्पण
सोलापूर : एचडीएफसी बॅंकेच्या अर्थसाहाय्यातून आणि कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट च्या सहयोगातून सोलापूर महानगरपालिकेच्या कँम्प परिसरातील ८ शाळेतील मुली आणि मुलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आले. या विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा शनिवारी, १६ डिसेंबर रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील विद्यार्थी आणि कर्मचारी मिळून सर्वसाधारण १, ८०० ते २, ००० मनुष्यसंख्येचा ही बंदिस्त शाळा परिसर असून शौचालयाच्या मर्यादित संख्येमुळे पर्यावरण आणि आरोग्य विषयक समस्या उद्भवत होती, याचा गांभीर्यपूर्वक विचार करून महानगरपालिका शाळा प्रशासनाने एचडीएफसी च्या सीएसआर निधीच्या मदतीने नविन सुसज्ज स्वच्छतागृह निर्मितीच्या प्रकल्पाची मागणी केली होती.
या अंतर्गत कोहिजन फाउंडेशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या सहयोगातून आणि सोलापूर महानगरपालिका शाळा प्रशासनाच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प एकुण २३४० स्वे. फुट एवढ्या जागेत मुलींसाठी १० आणि मुलांसाठी १० शौचालय खोल्या याला जोडून मुलीसाठी १७ आणि मुलासाठी १७ मुतारी अशा प्रकारच्या गुणवत्तायुक्त स्वच्छतागृहाचे निर्माण करण्यात आले.
या विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी शालेय परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त विद्या पोळ होत्या.
लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना आयुक्त यांनी सीएसआर निधीतून झालेल्या विवीध कामाचे कौतुक केले आणि महानगरपालिका सोलापूर यांच्या संयुक्तिक भागीदारीतून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात भरीव काम करू शकण्याचा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर सोमपा चे प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी संजय जावीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
एचडीएफसी बॅंकेचे प्रातिनिधिक पदाधिकारी म्हणून क्लस्टर हेड सुनील मनहास, सोलापूर जिल्हा शाखा प्रमुख मयूर गाजरे, एरिया हेड अजिंक्य पुरवत तसेच कोहिजन फाउंडेशन ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक डाॅ. दयानंद वाघमारे, मनोहर दावणे, स्नेहल पाटील, ज्ञानेश्वर बनसोडे, शाळा परिवेक्षक भगवान मुंडे, मुख्याध्यापक, कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.