Type Here to Get Search Results !

मसाप दक्षिण सोलापूर आयोजित आणि इमॅजिनियस स्टुडिओ प्रस्तुत 'दास्तान-ए-इश्क' बुधवारी अँम्फी थिएटरमध्ये सादर


मसाप दक्षिण सोलापूर आयोजित आणि इमॅजिनियस स्टुडिओ प्रस्तुत 'दास्तान-ए-इश्क' बुधवारी अँम्फी थिएटरमध्ये सादर

सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आयोजित तसेच इमॅजिनियस स्टुडिओ कोल्हापूर प्रस्तुत हिंदी गाण्यावर आधारीत 'दास्तान ए इश्क' कार्यक्रम बुधवारी, २० डिसेंबर रोजी सायंकाळी ०६ वा. लोकमान्य टिळक सभागृह, अँम्फी थिएटर, पार्क चौक येथे होणार असल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे आणि इमॅजिनियस स्टुडिओ कोल्हापूरचे पराग ठाणेकर यांनी दिली.

सोलापूरच्या रसिक श्रोत्यांसाठी कोल्हापूरच्या प्रतिभावान कलाकारांकडून हा हिंदी गाण्यांचा नजराणा पेश होणार आहे. कोल्हापूरच्या इमॅजिनियस स्टुडिओच्या माध्यमातून मोजक्याच कलाकारांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आणि नाविन्यपूर्ण तयार केलेला कार्यक्रम दास्तान ए इश्क म्हणजेच गोष्ट प्रेमाची... !


प्रेम या संकल्पनेभोवती विणलेला थीम शो म्हणजेच दास्तान ए इश्क आहे. प्रेम या भावनेमागील मानसिकता, त्यात टप्प्या टप्याने होणारी स्थित्यंतरे, अनुषंगिक प्रसंग हे सर्व उलगडून दाखवणारा हा कार्यक्रम असून प्रेमाच्या प्रवासातील पायऱ्या प्रवाहीपणे पुढे नेणारी गाणी आणि क्रमाक्रमाने उत्कंठा वाढवत नेणारे मनोरंजक निवेदन या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. असेही यावेळी प्रशांत बडवे आणि पराग ठाणेकर यांनी सांगितले. 

या कार्यक्रमात शिरीष कुलकर्णी, रणजित बुगले, रविराज पोवार,राधिका ठाणेकर, नम्रता कामत या गायकांकडून हिंदी गाण्याचे सादरीकरण होणार आहे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदन पराग ठाणेकर करणार आहेत. सार्वकालीन सुप्रसिध्द आणि लोकप्रिय अशा हिंदी गाण्यांचा हा कार्यक्रम असून सोलापूरकरांसाठी कोल्हापूरच्या कलाकारांनी मोफत या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या माध्यमातून केलं आहे. 

या हिंदी गाण्याच्या मैफलीत सोलापूरकर रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे प्रमुख कार्यवाह जितेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष अमोल धाबळे यांनी केले आहे.