सोलापूर शहर गुन्हेच्या कामगिरीत घरफोडीचे ०३ गुन्ह्याचा उकल
सोलापूर : पोलीस आयुक्तालय हद्दीतील विविध पोलीस ठाण्याकडे दाखल घरफोडीचे ०३ गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. एका विधी बालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ०१.१८ लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक आणि त्यांच्या पथकास मिळालेल्या खबरीनुसार विडी घरकुल येथील सोना-चांदी अर्पाटमेंन्ट ते गोंधळे वस्ती रोडवरील, सोनीया नगर येथे एक मुलगा चोरीचे दागिणे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पोनि विजय पाटील, सपोनि श्रीनाथ महाडीक व त्यांचे तपास पथकाने विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्याने सोलापूर शहररात दोन ठिकाणी घरफोडी चोरी केले असल्याचे कबुली दिली. त्यानंतर, त्या विधीसंघर्ष बालकाने त्याच्या आईच्या उपस्थीतीत जेलरोड व जोडभावी पेठ पोलीस ठाण्याकडे दाखल ०२ गुन्ह्यातील चोरीचे सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम काढून दिली. तो ऐवज जप्त करण्यात आला. त्यात २१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, १४० ग्रॅम वजनाची चांदी आणि २२,५०० रुपयांची रोकड असा एकूण १,०९,००० रुपये किंमतीचा मुद्देमालाचा समावेश आहे.
सपोनि श्रीनाथ महाडिक व त्यांचे तपास पथकास मिळालेल्या माहितीवरून, त्यांनी आरोपी प्रशांत दत्तात्रय गरडे, (वय-२० वर्षे, रा. कल्याण नगर भाग-२, सोलापूर) आणि सोमलिंग सिध्दाराम फुलारी ( वय-१९ वर्षे, रा. कल्याण नगर भाग-१, सोलापूर) यांना ताब्यात घेवून, त्यांच्याकडे सखोल तपास केला असता, त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्याकडे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले वेगवेगळ्या कंपनीचे सिगारेट पाकीट चोरल्याची कबुली देऊन, सदरचा चोरीचा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करणेत आला आहे.अशा प्रकारे, सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून, घरफोडी चोरीचे ०३ गुन्हे उघडकीस आणून १,१८,३१० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त, (गुन्हे) श्रीमती प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिल दोरगे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि विजय पाटील, सपोनि श्रीनाथ महाडीक, पोसई अल्फाज शेख व पोलीस अंमलदार अंकुश भोसले, विजय वाळके, शैलेश बुगड, आबाजी सावळे, अभिजीत धायगुडे, विठठल यलमार, धिरज सातपुते, राजकुमार वाघमारे, रत्ना सोनवणे, सायबर पोलीस ठाणेकडील अविनाथ पाटील, प्रकाश गायकवाड यांनी पार पाडली.