Type Here to Get Search Results !

डॉ. आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हर्षवर्धन प्रशालेत अभिवादन


डॉ. आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण 

दिनानिमित्त हर्षवर्धन प्रशालेत अभिवादन

सोलापूर : विश्वरत्न, संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तळे हिप्परगे येथील हर्षवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. 

प्रारंभी संस्थेचे सचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठलराव गरड यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेतील क्रीडा शिक्षक सुरेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आपली मनोगते व्यक्त केली. 

यावेळी प्रशालेतील सहशिक्षक सुधाकर ढगे यांनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत यांनी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे शिक्षण घेऊन वैयक्तिक तसेच सामाजिक सुधारणा करूया, असे आवाहन विद्यार्थ्यांना  केले. यावेळी संस्थेचे सदस्य विपुलराव गंभीरे प्रशालेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जवंजाळ यांनी केले, सूत्रसंचालन श्रीमती पल्लवी दराडे यांनी केले. शेवटी सुरेश शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.