बाबासाहेब लिहितात...
" पैश्यांची फार कमतरता आहे त्यामुळे नवीन पुस्तके विकत घेण्याइतकी क्षमता नाही... पण ज्ञानाची भूक एवढी तीव्र आहे... सध्या मुरंबा लावलेला पाव त्या पावाचे दोन चार तुकडे करून उदरनिर्वाह करतो... ग्रंथालयात खाण्यावर बंदी आहे पण वेळ मिळताच मी कोणाच लक्ष नसताना ते खातोय.... सकाळ झाली की ग्रंथालयात केव्हा संध्याकाळ उलटते कळत नाही...
काही पुस्तकांची पाने वाचायची राहिले की ती रुखरुख जीवाला लागते... मी पान क्र लक्षात घेऊन पुनश्च उद्या सकाळी ते पुस्तक वाचायला घेतो खूप जबाबदारी आहे... माझा शैक्षणिक उद्देश हा एकमात्र आहे... तो म्हणजे प्रचंड ज्ञानसाधना... पुस्तकात रमल्यानंतर कशाचं भान उरत नाही... पुस्तकांची पाने चाळताना मला कसलाच बाहेरचा गोंगाट ऐकू येत नाही... भूक सतावत नाही... तहान ही फारशी लागत नाही... संध्याकाळी एकवेळच जेवण घेतो... जेवण फार मोजक असत... अगदी जगण्यासाठी लागेल इतकंच... भाकरीची फार आठवण येते... पावाचा तुकडा खाताना ग्रंथपालाची नजर पडलीच आणि ते रागावले...!
खरंतर त्यांचं ते रागावणे साहजिक होत. मी खरंतर ग्रंथालयाचा नियम तोडला होता आणि त्यासाठी मी त्यांना म्हटले ही की, यापुढे अस काही होणार नाही... त्यांचा रागावलेला चेहरा हास्यस्मितात कधी बदलला कळाल नाही... आणि गोऱ्या साहेबांच्या ठसक्यात म्हणाला की , आंबेडकर उद्या पासून दुपारच जेवण माझ्यासोबत घ्यायचं मी उद्यापासून माझ्या डब्याची क्षमता वाढवून आणतो...!
खरंतर फार गलबलून आलं तेव्हा...! शिक्षण ,वाचन ,संशोधन यामध्ये कधी ही खंड पडता कामा नये... परिस्थिती कितीही वाईट असली तरी तिथून मार्ग काढावाच... - भूक, फार तीव्र असते... एक भूक शरीरासाठी असते...आणि दुसरी मेंदूची भूक... एक केवळ जगण्यासाठी पुरेशी आहे पण दुसऱ्या भुकेविना जगणं अशक्यच...
संदर्भ - बाबासाहेबांच्या जीवन प्रवासातून...
(शिवभार : अ. भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषद यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर हजरत काझी, मंगळवेढा यांनी केलेलं शेअरींग)