विजेच्या धक्क्याइतकीच धक्कादायक घटना; कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू
सोलापूर : विद्युत डीपीवर चढून दुरुस्तीचे काम करत असताना जोरात विजेचा धक्का लागल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झालेल्या एम एस ई बी च्या कंत्राटी वायरमनचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही विजेच्या धक्क्याइतकीच धक्कादायक घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास शेळगी परिसरातील जवाहर नगर या ठिकाणी घडली. अविनाश मूळजे (वय अंदाजे ४५वर्ष) असे मरण पावलेल्या कंत्राटी वायरमनचे नाव आहे.
अविनाश मुळजे हे शेळगी परीसरातील जवाहर नगर येथील डीपीवर चढून विद्युत दूरुस्तीचे काम करत असताना जोराचा विद्युत झटका लागल्याने डीपीवरून खाली कोसळले, त्यात ते गंभीर जखमी झाले. त्या अवस्थेत त्यांना तात्काळ जवळच असलेल्या हैदराबाद रस्त्यावरील यशोधरा हॉस्पिटल येथे दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.