विवाह नोंदणी दाखल्यासाठी स्विकारली एक हजाराची लाच
सोलापूर : ०१ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामसेवकास रंगेहाथ पकडलय. विठ्ठल पांडुरंग शिंदे असं त्या लाचखाऊ ग्रामसेवकाचं नांव आहे. शिंदे यांनी तक्रारदाराकडे विवाह नोंदणी दाखला देण्यासाठी ती रक्कम मागितली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आलीय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहाथ पकडलंय.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामसेवक विठ्ठल शिंदे (बेलाटी) यांनी, विवाह नोंदणी दाखल देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडं तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची पडताळणी करुन, एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. ही कारवाई गुरुवारी दुपारच्या सुमारास उत्तर सोलापूर पंचायत समिती कार्यालय परिसरात झाली.
ग्रामसेवक विठ्ठल शिंदे यांच्याकडे विवाह नोंदणी दाखला मिळण्यासाठी अर्ज आला होता. दाखला देण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी ग्रामसेवकानं केली होती. ती लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ग्रामसेवक शिंदे याच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.
(सविस्तर लवकरच ...)